सातपुडा पर्वताच्या दक्षिणेस नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेले खैरगाव हे छोटसं गाव . १९९१ च्या वर्धा नदीच्या पुराने मोवाड ,खैरगाव ,थुगाव ,जलालखेडा सह अनेक गावाचा उध्वंस करून वर्धा नदीने परिसरातील नागरिकांचे जीवनच उध्वस्त केले . २० वर्षांपेक्षा जास्त काळ ओलांडला तरी या ग्रामीण भागातील व्यक्तीचे राहणीमान उंचवू शकले नाही . उध्वस्त झालेली शेती आणि पुनर्वसन यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे मोठे संकटच उभे राहले . या संकटावर मात करण्यासाठी वैचारिक बुद्धीजीवी तरुणांनी संघटीत होऊन बेरोजगारीवर मात करण्यासाठी व ग्रामीण भागातील व्यक्तींचे जीवन उंचावण्यासाठी सेल्फ स्टडी सर्कल ची स्थापना झाली .
" सेल्फ स्टडी सर्कल " या शब्दामध्येच संस्थेचे स्वरूप लक्षात येते . स्वतःच, स्वतःसाठी, स्वतःकरिता एकत्रित येवून तयार केलेले सर्कल म्हणजे सेल्फ स्टडी सर्कल होय. सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी ही अतिशय वैशिष्टपूर्ण आहे . मोवाड, खैरगाव व परिसर म्हणजे शिक्षकांचे जणू माहेरघरच . डी.एड. शिक्षित बेरोजगारांची खानचं याठिकाणी पहावयास मिळते . सुरवातीला फक्त शिक्षक बनण्यासाठी एकत्र आलेल्या युवकांचे नेतृत्व केले ते नितीन मानकर व निलेश सोनकुसळे यांनी . या ग्रुप च्या माध्यामातून १५ पेक्षा जास्त व्यक्ती शिक्षक म्हणून नोकरीवर लागले ,परंतु त्यापेक्षाही अधिक विध्यार्थी बेरोजगाराच राहले . पण योगायोग असा कि ज्या व्यक्तीने हा ग्रुप चालविला त्या व्यक्तींना परिसरातच नोकरी लागली आणि खऱ्या अर्थाने सेल्फ स्टडी सर्कल ची सुरवात येथूनच झाली .
आपल्या सोबत तयारी करणारे विद्यार्थी बेरोजगारच राहले त्याचबरोबर डोळ्यासमोर दिसत असलेल्या बेरोजगार मित्रांना रोजगार मिळावा यातून निर्माण झालेली सामाजिक बांधिलकी जपून श्री नितीन मानकर व श्री निलेश सोनकुसळे या युवकांनी सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव ची स्थापना केली . या उभारणीला खरी साथ लाभली ती सीताराम मेहेत्रे ,मंगेश गणोरकर ,सुनील ढेपले ,रवी बनकर ,भूषण कानिरे,श्रीकांत मानकर याची. सध्यस्थितीत त्याला सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हर्शल कोरडे, प्रतिक दातीर, दिनेश कोरडे, नितीन कठाणे ,मनोज खसारे , इ. सर्व सदस्य मनपुर्वक जबाबदारी संभाळत आहे. ही चळवळ टिकवण्यासाठी आणि याला व्यापक स्वरूप देण्यासाठी सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव मधील सर्व सदस्य मनपूर्वक प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहील.
सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव चे उद्दिष्टे :-
* ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना संघटीत करून रोजगार मिळविण्यासाठी प्रेरित करणे .
* स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे .
* ग्रामीण भागातून I A S , I P S अधिकारी तयार करणे .
* ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त यश संपादन करण्यासाठी भौतिक सोयीसुविधा पुरविणे
* ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचे जाळे तयार करण्यासाठी गावोगावी वाचनालये चालविणे .
* ग्रामीण भागातील युवकांना स्वबळावर उभे करण्यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे .
*
सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव चे स्वरूप :-
सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे फक्त खैरगाव या गावापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण नागपूर व अमरावती जिल्ह्यात कार्यरत आहे . मोवाड ,खैरगाव ,सावरगाव ,गणेशपूर,बेलोना ,नरखेड,थुगाव,जलालखेडा, काटोल, इत्यादी अनेक गावातील संपूर्ण युवकवर्ग यामध्ये आपले योगदान करीत आहे .
युवकांना स्वताच्याच गावात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव युवकांना प्रदान करते . गावोगावी विद्यार्थ्याचे ग्रुप तयार करून त्या ग्रुप मध्ये स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते . प्रत्येक रविवारी हे सर्व ग्रुप खैरगाव या ठिकाणी एकत्रित येऊन आठवड्यातील आपल्या अभ्यासाचे मूल्यमापन स्पर्धा परीक्षेच्या पेपर च्या माध्यमातून करून घेतात .
सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव ची वैशिष्टे :-
* सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेचे चळवळ चालवणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे .
* सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे विनाशुल्क विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करते .
* सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे सामाजिक बांधिलकी जपून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांसाठी मोलाचे कार्य करते .
* सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे स्वयंअध्ययन तत्वावर चालणारी एकमेव संस्था आहे .
सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव चे उपक्रम :-
* सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे गावागावात स्पर्धा परीक्षेचे ग्रुप चालवतात .
* UPSC ची तयारी करण्यासाठी IAS COACHING CENTER चालवतात .
* गावागावात पोलीस भरती प्रशिक्षण वर्ग चालवतात .
* MPSC ची तयारी करण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग चालवितात .
* SSC, BANKING,RAILWAY, POST,व इतर स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र वर्ग चालवितात .
* राज्य तथा केंद्र सरकारच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या विविध पदांसाठी विशेष वर्ग चालवितात .
* सेल्फ स्टडी सर्कल खैरगाव हे विद्यार्थ्यांसाठी COMPUTER INSTITUTE चालवितात .
* ग्रामीण भागातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षेचे स्वतंत्र ग्रंथालय चालवितात .
आमच्याविषयी माहिती वाचण्याबद्दल आपले मनपुर्वक आभार....
आपल्या प्रतिक्रीया, सूचना, मार्गदर्शन, Comments box मार्फत आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा.....
Nice circal on narkhed tahsil
ReplyDelete