नमस्कार मित्रांनो..... SELF STUDY CIRCLE KHAIRGAON या वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे...........!
Image Hosted At MyspaceGens

Tuesday, 4 August 2015

स्पर्धा परीक्षेच्या (UPSC, MPSC) A to Z तयारीसाठी लेखमाला......

स्पर्धा परीक्षांचे  अंतरंग .....( लेख क्र . ६ )


स्पर्धापरीक्षांचे अंतरंग
मागील स्तंभात आपण विद्यापीठीय परीक्षा व स्पर्धा परीक्षा यातील फरक समजवून घेण्यास सुरुवात केली होती. आज आपण ही चर्चा पूर्णत्वाला नेऊ या.
...

>> विद्यापीठाची परीक्षा दिल्यावर पदवी मिळते, पण बऱ्याच वेळा ती मिळतेच असे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये उलट चित्र आहे. खूप अभ्यास करूनही कोणतीही पदवी मिळत नाही, पण स्थायी नोकरी मात्र मिळते.

>> विद्यापीठाच्या परीक्षांचा कल विशेषिकरण तपासण्याकडे असतो, तर स्पर्धा परीक्षांचा कल सामान्य ज्ञान तपासण्याकडे असतो.

>> विद्यापीठीय परीक्षांमध्ये एखादा नावडता धडा टाळता येतो, ऑप्शनला टाकता येतो, स्पर्धा परीक्षांमध्ये ती सोय नसते. स्पर्धा परीक्षांची रचना अशाप्रकारे केली असते, की कुठलाही एखादा घटक किंवा उपघटक टाळता येत नाही. त्यामुळे गुण कमी पडू शकतात आणि जिथे एकेका गुणावर रँक वर-खाली होते, तिथे हा हलगर्जीपणा परवडत नाही.

>> विद्यापीठीय परीक्षांमध्ये आपली स्पर्धा एकाच प्रकारच्या उमेदवारांमध्ये असते. जसे कला शाखेचे विद्यार्थी आपसातच स्पर्धा करतात किंवा विज्ञान शाखेचे त्याच शाखेत स्पर्धा करतात. स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र सर्व प्रकारचे पदवीधर स्पर्धेत असतात. थोडक्यात बीए, बीकॉम, डॉक्टर, इंजिनीअर, एमबीए या सर्वांची एकमेकांशी स्पर्धा असते. त्यामुळे काही वेळा स्पर्धेचा अंदाज येत नाही.

>> विद्यापीठीय परीक्षांमध्ये जास्त जण उत्तीर्ण होतात. थोडक्यात निकाल दणदणीत लागतो. स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र एक टक्क्याहून कमी निकाल लागतो. जेवढी पदे उपलब्ध असतात तेवढ्याच रँक घोषित होतात.

>> अखेरचा फरक म्हणजे विद्यापीठीय परीक्षांचा अभ्यासक्रम काटेकोर असतो, त्यावर पाठ्यपुस्तकेही ठराविक असतात व परीक्षेच्या आधी Question Bank दिली जाते. त्यातून प्रश्न येतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम दिला असतो, पण तो फक्त निर्देश करण्याचे काम करतो. उदा. सामान्य विज्ञान. या सामान्य विज्ञानात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र असे उपघटक असल्याचे गृहीत असते व त्यातीलही काहीही विचारले जाऊ शकते. एकाच पुस्तकातील अभ्यासाने स्पर्धा परीक्षांमधील अभ्यास आवाक्यात येत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी बाजारात Question Bank उपलब्ध असल्या तरी कोणते प्रश्न येतील, याचे अचूक भाकित करता येत नाही.


- भूषण देशमुख

(लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.)


सौजन्य …………. महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times


                        ............पुढच्या भागातः- स्पर्धा परीक्षेच्या चौकटीविषयी